||स्वराज्याचे तोरण बांधले (स्वाध्याय)||
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली,परंतु स्वराज्य स्थापन करणे हे मोठे अवघड कार्य होते. परंतु शिवरायांचा निश्चय पक्का होता. त्यांना माहित होतं हे स्वराज्य साठी किल्ले ताब्यात असणे महत्त्वाचे आहे. म्हणून त्यांनी असाच एक किल्ला निवडला की ज्याकडे आदिलशहाचे फारसे लक्ष नव्हते. तसेच त्यावर सैनिकांचा पहारा देखील कडक नव्हता. शिवरायांनी मोठ्या चातुर्याने आपल्या निवडक सैनिकांसह त्या किल्ल्यावर हल्ला केला आणि तो किल्ला ताब्यात घेतला. त्या किल्ल्याचे नाव होते तोरणा. जणूकाही शिवरायांनी तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरणच बांधल! नंतर या किल्ल्याची डागडुजी करत असताना, मावळ्यांना चार मोरांनी भरलेल्या घागरी सापडल्या सर्व मावळ्यांनी त्या चारही घागरी स्वराज्याच्या कामी याव्यात म्हणून शिवरायांच्या स्वाधिन केल्या. तर अशा या "स्वराज्याचे तोरण बांधले" या पाठावरील स्वाध्याय मी आपणास पुढे दिलेला आहे. तो सोडून स्वतःची प्रगती तपासून पाहण्यासाठी सबमिट केल्यानंतर VIEW SCORE या बटनला टच करून पाहू शकता.
0 टिप्पण्या