।।भारतरत्न पुरस्कार।।

भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्मान राष्ट्रीय सेवेसाठी दिला जातो. या राष्ट्रीय सेवा मध्ये कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि क्रीडा यांचा समावेश आहे. या सन्मानाचा प्रारंभ 2 जानेवारी 1954 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या काळात केला गेला. सुरुवातीला हा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर देण्याची प्रथा नव्हती. इसवी सन 1955 मध्ये हा नागरी सन्मान मरणोत्तर सुद्धा देण्याची तरतूद करण्यात आली. हा नागरी सन्मान एका वर्षात जास्तीत जास्त तीन व्यक्तींना देण्यात येतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना इसवी सन 1954 साली पहिला भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत प्राप्त भारतरत्न पुरस्काराचे मानकरी व त्यांना पुरस्कार मिळाल्याची वर्ष यांची पुरस्कार सुची पुढीलप्रमाणे आहे.