Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

कालगणना|प्रश्नसंच-12|कालमापन@गोदाई फाउंडेशन हनवतखेड

 कालमापन शिकूया सोप्या शब्दात....



भारताच्या भौगोलिक इतिहासाचा आपण अभ्यास केला असता,आपल्या असे लक्षात येते की भारतीय कालगणनेला समृद्ध असा इतिहास लाभलेला आहे. भारताच्या प्राचीन संस्कृतीमध्ये कालगणनेची बीजारोपण झालेले आहे हे आपल्या लक्षात येते. भारतीय कालगणना ही सूर्याचे अस्तित्व, पृथ्वीचे परिवलन आणि दिवस-रात्र घटनाक्रम यावर आधारित आहे.
     काल गणना करत असताना दिन आणि रात्र मिळून एक दिवस होतो. एका दिवसाचे चोवीस तास असतात तर 30 दिवसाचा एक महिना गणला जातो आणि सर्व साधारण वर्षां मध्ये 365 दिवस असतात. तसेच कालगणनाही तास, मिनिटे आणि सेकंद या एकका मध्ये देखील करतात. या एककात कालगणना करण्यासाठी काल "गणनायंत्र" ज्याला आपण घड्याळ(WATCH) असे म्हणतो. घड्याळांमध्ये तीन दर्शक काटे असतात. जसे की तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा या सर्वांचा एकमेकाशी संबंध असतो. तो पुढील प्रमाणे; साठ मिनिटाचा एक तास होतो. तर साठ सेकंदाचा एक मिनिट होतो आणि 24 तासाचा एक दिवस होतो. यानंतर सात दिवसाचा एक आठवडा; चार आठवड्याचा एक महिना आणि बारा महिन्याचं एक वर्ष होते. तर अशाप्रकारे कालगणना आपल्या भारतीय उपखंडामध्ये केली जाते. तसेच मराठी महिन्यामध्ये सुद्धा काल गणना केली जाते. मराठी नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्या ने होते आणि शेवट फाल्गुन महिन्याने होतो. तर अशा या कालगणनेवर आधारित चाचणी पुढे दिलेली आहे. ती सोडवून आपली प्रगती तपासून पाहण्यासाठी VIEW SCORE या बटन ला टच करावे.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code