||चवदार तळ्याचे पाणी (स्वाध्याय)||


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,

              स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहामुळे गोरगरीब लोकांना महाड येथील तळ्याचे पाणी वापरण्याची मुभा दिली गेली. अशा या इतिहासातील अजरामर घटनेवरील आधारित ही कविता आहे. कवयत्री अनुराधा साळवेकर यांनी लिहिलेली ही कविता सत्य घटनेवर आधारीत आहे. या कवितेमध्ये चवदार तळ्याच्या सत्याग्रहामुळे सामान्य जनतेत कोणते बदल झाले? तसेच गोरगरिबांना या घटनेने कसे प्रेरित केले? याविषयी सविस्तर वर्णन कवयित्रीने केलेले आहे चवदार तळ्याचे पाणी या सत्याग्रहाने मानवाचे आत्मभान जागे करून मानवास मीपण देण्याचे काम केलेले आहे. तरी अशा या अभूतपूर्व घटनेवर आधारित असलेली कविता म्हणजेच चवदार तळ्याचे पाणी होय. तरी या कवितेवर आधारित स्वाध्याय मी पुढे दिलेला आहे तरी तो सोडून तुम्ही VIEW SCORE या बटन वर क्लिक करून स्वतःची प्रगती तपासू शकता.