Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Vitamins|जीवनसत्त्वे|गोदाई फाउंडेशन हनवतखेड

 जीवनसत्वे आणि आपले जीवन....



जीवनसत्त्वे (Vitamins):-

सर्व सजीवांच्या वाढीसाठी कर्बोदके, मेद, प्रथिने आवश्यक असतात. या कार्बनी पदार्थांव्यतिरिक्त काही विशिष्ट कार्बनी संयुगांची अल्प प्रमाणात आवश्यकता असते. या संयुगांची त्रुटी निर्माण झाल्यास सजीवांची वाढ खुंटते. तसेच त्यांना काही विकार उद्भवतात. अशा कार्बनी संयुगांना जीवनसत्त्वे म्हणतात.

 हे शरीराच्या आरोग्यासाठी थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे पोषक घटक आहेत. ज्याची सगळ्या जीवांना अल्प प्रमाणात आवश्यकता असते, अशी ही जीवनसत्वे ही आहाराचे अंश आहेत. जीवनसत्त्वे ही कार्बनची संयुगे असतात. ही व्हिटॅमिन्स शरीरामध्ये निर्माण होऊ शकत नाहीत. जीवनसत्त्वाचे २ प्रकार आहेत.

1]जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारी)

ब आणि क ही जीवनसत्त्वे पाण्यात विरघळतात.

2]स्निग्ध विद्राव्य (स्निग्ध पदार्थात विरघळणारी ) - अ, ड, ई, आणि के ही जीवनसत्त्वे स्निग्ध विद्राव्य आहेत.

जलविद्राव्य जीवनसत्त्वांची कमतरता लगेच लक्षात येते आणि ती शरीरात घेतल्यास कमतरतेची लक्षणेसुद्धा लगेच निघून जातात. उलटपक्षी स्निग्धविद्राव्य जीवनसत्त्वांची कमतरता लगेच लक्षात येत नाही आणि उपचार दिल्यावरही त्यांची कमतरता भरून येण्यास काही वर्षे इतका कालावधी लागतो. जलविद्राव्य जीवनसत्त्वे शरीरात साठून राहत नाहीत. ती अधिक मात्रेत दिली गेल्यास, त्यांचे उत्सर्जन होते.


जीवनसत्त्वे या घटकांवर आधारित चाचणी पुढे दिलेली आहे .ती सोडवून स्वतःची प्रगती तपासून पाहण्यासाठी पुढील सबमिट केल्यानंतर VIEW SCORE या बटनला क्लिक करावे.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code