||शब्द||
(मराठी कविता)
वाणी चा अर्थ सांगती शब्द
भाषेला शृंगार करती शब्द
शब्दालाही निशब्द करिती शब्द
अधिकार हा भाषेला सांगती शब्द||१||
वार शस्त्राचा असे विनाशी,
मार शब्दाचा असे अविनाशी,
संवाद जीवनाचा करून एकमेकाशी,
नाळ जोडती शब्द जीवनाशी||२||
शब्दांनी सांगितले शब्दांसवे,
जनाशी संवाद कसे असावे,
शब्दच देती बल मन आसवे,
शब्दच देती डोळ्यात आसवे||३||
शब्दच पेटवीते रान,
शब्दच हरविते भान,
ताकत शब्दाची महान,
शब्द वापरावे जपून||४||
वानी चा अर्थ सांगती शब्द,
भाषेला शृंगार करीती शब्द.
-कवि गजराज
कविता चालिवर ऐकण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करावे.
0 टिप्पण्या