महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने:

आपल्या महाराष्ट्रात ६ राष्ट्रीय उद्याने, 50 अभयारण्ये, ४ संवर्धन राखीव क्षेत्र अशी एकूण ५८ वन्यजीव संरक्षित क्षेत्रे आहेत. त्याचे एकूण क्षेत्रफळ १००५४.१३ चौ.कि.मी. म्हणजे राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३.२६ टक्के इतके आहे.
राज्यातील १९ संरक्षित क्षेत्रांचा समावेश करून (६ राष्ट्रीय उद्याने आणि १४ अभयारण्ये) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, नागपूरचा पेंच व्याघ्र प्रकल्प, अमरावतीचा गुगामल व्याघ्र प्रकल्प, सांगली व कोल्हापूर चा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प नवेगाव-नागझिराचा व्याघ्र प्रकल्प आणि बोरचा व्याघ्र प्रकल्प असे सहा व्याघ्र राखीव क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. यापैकी बोर व्याघ्र प्रकल्पाची कार्यवाही सध्या सुरु आहे.
सहा राष्ट्रीय उद्याने पुढील प्रमाणे:-

1]ताडोबा राष्ट्रीय उद्यान :-




ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आहे. येथे वाघांची वस्ती आहे. हा प्रकल्प हा ताडोबा अभयारण्याचे ११६.५५ कि.मी. क्षेत्र व अंधारी अभयारण्याचे ५०८.८५ चौ.कि.मी.क्षेत्र मिळून संयुक्तपणे बनलेला आहे. याचे एकूण क्षेत्र सुमारे ६२५ चौ कि.मी. आहे. 
क्षेत्र: ६२५.४ km²
स्थापना केली: १९५५
ठिकाण: चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
क्षेत्रफळ: ६२५.४ चौरस किलोमीटर

2]नवेगाव राष्ट्रीय उद्यान:-

नवेगाव राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना २२ नोव्हेंबर, १९७५ रोजी झाली.
क्षेत्र: १३३.९ km²
स्थापना केली: १९७५



3]गुगामल राष्ट्रीय उद्यानः-

गुगामल राष्ट्रीय उद्यान भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या अमरावती जिल्हयात आहे. हे उद्यान वाघांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. थंड वातावरण, धबधबे, तलाव, हिरवेगार गवत यामुळे उन्हाळयातील पर्यटन स्थळ म्हणून या उद्यानास महत्त्व आहे. १७०० वर्ग कि.मी.चे क्षेत्र भारतीय वाघांसाठी प्रसिद्ध आहे
स्थापना:१९७५

4]पेंच राष्ट्रीय उद्यानः-

पेंच राष्ट्रीय उद्यान हे भारतातील मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यांच्या सीमाभागात वसलेले राष्ट्रीय उद्यान आहे. 257.26वर्ग कि.मी. क्षेत्रफळाच्या या उद्यानाचा विस्तार महाराष्ट्राच्या हद्दीत मोडतो. नागपूरपासून ८६ कि.मी. अंतरावरील हे उद्यान खूप सुंदर आहे. आज या उद्यानाची योग्य ती निगा राखल्यामुळे नागपूर परिसरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र हे 22 नोव्हेंबर,1975 रोजी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले असून केंद्र शासनाने 18 फेब्रुवारी, 1999 रोजी भारतातील 25वा व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर केला.

5]संजय गांधी राष्ट्रीय उद्यानः-

मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर (पण मुंबईच्या परीसरात) हे राष्ट्रीय उद्यान आहे. याचे क्षेत्रफळ १०४ चौरस किमी आहे. येथील कान्हेरी लेण्यांमुळे याला (कृष्णगिरी) म्हणजे ‘काळा पहाड’ हे नाव पडले. ब्रिटिश आमदानीत वनविभागाची स्थापना झाल्यावर या वनविभागाचे सर्वेक्षण होऊन २०.२६ चौ. कि.मी. क्षेत्रफळाचे "कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान" निर्माण झाले. १९७४ साली त्याचे नाव 'बोरीवली राष्ट्रीय उद्यान' असे झाले. १९८१ मध्ये नावात बदल परत एकदा बदल होऊन या उद्यानाला 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' असे नाव ठेवले..

6]चांदोली राष्ट्रीय उद्यान:-

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील हे राष्ट्रीय उद्यान आहे. २००४ मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. चांदोली धरणाच्या तलावात नावेतूनही जंगल फिरता येते.दुर्गवाडीच्या उतरून पायी भटकता येते.दुर्गवाडीच्या डोंगरावरून चांदोली जलाशयाचा परिसर दिसतो. 

क्षेत्र: ३१७.७ km²

स्थापना केली: मे २००४

स्थापना राष्ट्रीय उद्यानावर अधारीत प्रश्नपत्रिका पुढे दिली आहे ती सोडवून स्वतःची प्रगती तपासून पहाण्यासाठी VIEW SCORE बटनला क्लिक करावे. 

             राष्ट्रीय उद्याना संबंधी माहिती देणारा तसेच त्यासंबंधी ट्रिक सांगणारा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करावे.
Gggg