||धाडसी हाली (स्वाध्याय)||


नमस्कार विद्यार्थी मित्रहो,

                            धाडसी हाली या पाठांमध्ये एका शूर आणि धाडसी मुलीची मुलाखत लेखकाने घेतलेली आहे. हाली बरफ ही एक आदिवासी मुलगी आहे. ती तिच्या मोठ्या बहिणी सोबत तानसा अभयारण्या मध्ये लाकडे गोळा करण्यासाठी जाते आणि त्या ठिकाणी तिच्या मोठ्या बहिणीवर वाघ हल्ला करतो. अशा या कठीण परिस्थितीत हाली न घाबरता, त्या ठिकाणाहून पळ न काढता त्या वाघाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते. आरडाओरडा करते. तसेच वाघाला दगड फेकून मारते. शेवटी वाघ त्या ठिकाणाहून निघून जातो आणि हाली ची बहिण जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेली असते. अशातच आजूबाजूचे लोक हल्लीचा आरडाओरडा ऐकून त्या ठिकाणी गोळा होतात. हाली ची बहिण की जिचे नाव शकुंतला असते,तिला प्रथम शहापूरच्या सरकारी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल केले जाते. नंतर ठाण्याच्या सरकारी हॉस्पिटल मध्ये तिला भरती केले जाते. शेवटी शकुंतलाचे प्राण वाचतात. परंतु या सर्व कथेमध्ये हल्लीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होते. हालीला तिच्या धाडसाबद्दल 2013 सालचा वीर बापू गायधनी शौर्य पुरस्कार खुद्द पंतप्रधानाच्या हस्ते प्रदान केला जातो. आणि तिचे सर्वत्र कौतुक होते. तर अशा या धाडशी मुलीच्या कथेवर आधारित स्वाध्याय मी आपणास पुढे दिलेला आहे. तो सोडून सबमिट केल्यानंतर View score या बटनावर क्लिक करून तुमची प्रगती तपासून पाहू शकता.